भारताची सध्याची वेगवान गोलंदाजी पाहून ८० आणि ९०च्या दशकातील वेस्ट इंडिजचा संघ माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो – ब्रायन लारा

मुंबई: भारताची सध्याची वेगवान गोलंदाजी पाहून ८० आणि ९०च्या दशकातील वेस्ट इंडिजचा संघ माझ्या डोळ्यापुढे उभा राहतो, अशा शब्दांत महान फलंदाज ब्रायन लाराने भारतीय गोलंदाजांची पाठ थोपटली.

भारताकडे सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमीसह एकापेक्षा एक सरस असे भेदक गोलंदाज आहेत. त्याकडे बोट दाखवत लाराने भारतीय संघाची स्तुती केली. सध्याच्या भारताच्या संघात असं काय खास आहे, असं विचारलं असता वेगवान गोलंदाजी आक्रमण हे भारताचं बलस्थान असल्याचे लारा म्हणाला. मी या संघाला वेस्ट इंडिजमध्ये खेळताना पाहिलं आहे. बुमराह, शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार सगळेच प्रभावी मारा करणारे वेगवान गोलंदाज आहेत. भारताची सध्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर मला ८० आणि ९०च्या दशकातील आमचा संघ आठवतो, असे लारा म्हणाला.