
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी एका खाजगी वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच नारायण राणे यांना काँग्रेसकडून ही ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी राणे यांनी स्वतंत्रपणेच लढणे पसंत केले.
नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेशी युती केल्यामुळे भाजपला संपूर्ण राज्यभरात मोठे यशही मिळाले होते. त्यामुळे भाजप पुन्हा नारायण राणे यांना बरोबर घेईल की नाही हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे नारायण राणे यांना आता काही पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे त्यांना आता आपली राजकीय कारकीर्द वाचवायची असेल तर, त्यांच्याकडे पर्याय शिल्लक नाही. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर राज्यात काँग्रेसला नारायण राणे यांच्यासारख्या प्रभावी आणि आक्रमक नेत्याची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस देखील त्यांना पक्षप्रवेशाची ऑफर देत आहे.






