
मुंबई: आरकॉमकडून शुक्रवारी दुसऱ्या तिमाहीतील परिणाम जाहीर करण्यात आले. या तिमाहीत कंपनीला एकूण ३० हजार १४२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तपशील समोर आल्यानंतर आरकॉमचे शेअर्स ३.२८ टक्क्यांहून ५९ पैसे प्रति शेअर्सवर बंद झाले. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ११४१ कोटी रुपयांचा फायदा झाला होता.
दुसऱ्या तिमाहीतही ३० हजार १४२ कोटींच्या तोट्यानंतर उद्योगपती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) च्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अनिल अंबानी यांच्यासह मोठ्या पदावरील प्रमुख चार अधिकाऱ्यांनीही पदाचा राजीनामा दिला. आरकॉम सध्या दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. कंपनी विविध मालमत्ताही विक्रीला काढणार आहे.











