
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली असतानाच, देशभरात गाजलेल्या ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांच्या चौकशीची फाइल बंद करण्यात आली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांच्या उघड चौकशीची ही फाइल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी एका पत्रकाद्वारे अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना दिली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवारयांनी भाजपशी हातमिळवणी केली असतानाच, देशभरात गाजलेल्या ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांच्या चौकशीची फाइल बंद करण्यात आली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांच्या उघड चौकशीची ही फाइल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी एका पत्रकाद्वारे अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना कळविले आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची फाइल बंद करण्याबाबतच्या अंतिम चौकशी अहवालाचे अवलोकन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकांनी केले आहे.
भविष्यात आवश्यकता भासल्यास सरकारने काही नियम केल्यास किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.
नऊ प्रकरणांमध्ये अजित पवार यांचा कोणताही संबंध आढळून आलेला नाही, असे तीन महिन्यांपूर्वीच आम्ही सांगितले होते. तथापि अजित पवार यांच्याशी संबंधित अन्य प्रकरणांची चौकशी यापुढेही सुरूच राहणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंचन विभागाशी संबंधित ३ हजार पेक्षाही अधिक अनियमतिततांची चौकशी करत आहे, असे महासंचालक (एसीबी) परमबीर सिंग यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले.







