
मुंबई: मुंबई महापालिकेचे दवाखाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहण्याकरिता मुंबई स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव प्रारित करण्यात आला. महापालिकेत आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुंबईतील कुलाबा म्युनिसिपल दवाखाना, बी वॉर्डातील वालपाखाडी दवाखाना, डी विभागातील बाने कंपाऊंड दवाखाना, भायखळ्यातील साऊटर स्ट्रीट दवाखाना, रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना, बीडीडी चाळ दवाखाना, कलिना दवाखाना, ओल्ड खार दवाखाना, एन. जे. वाडिया दवाखाना, चौक्सी दवाखाना, गोराई म्हाडा दवाखाना, चुनाभट्टी दवाखाना, रमाबाई आंबेडकर दवाखाना आणि कांजूर व्हिलेज दवाखाना आदी १५ दवाखाने आता दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच स्थायी समितीत आला होता. त्याला सर्व सदस्यांनी आज तात्काळ मंजुरी दिली.











