वादग्रस्त चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ अख़ेर प्रदर्शित होणार नाहीच

PM Narendra Modi

राजकीय वादाचा विषय ठरलेला वादग्रस्त चित्रपट  ‘पीएम नरेंद्र मोदी’ अख़ेर होणार एप्रिलमध्येच प्रदर्शित होणार हे जवळ्पास निश्चित झाले होते आणि येणा‌-या 10 एप्रिल रोजी हा चित्रपट भारतासह जगभरातील एकूण 38 देशात प्रदर्शित होणार असे सांगितले जात होते. चित्रपटाचे निर्माते आणि वितरक आनंद पंडीत यांनी सांगितले की , येत्या 10 एप्रिल 2019 रोजी हा चित्रपट चाहत्यांसाठी सिनेमागृहात प्रदर्शित होत असून भारताबाहेरही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतू  कोर्टाने चित्रपट प्रदशनावर बंदी घातल्याने आता हा चित्रपट आचारसंहितेमुळे निवड्णुकीआधी प्रदर्शित होणार नाही हे जवळ्पास निछित झाले आहे.  भारतात हिंदी, तेलगु आणि तमिळ या भाषांमधून चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन उमंग कुमार याने केले असून चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका विवेक ओबेरोय याने केली आहे. चित्रपटात मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे.