कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

औरंगाबादेत अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

कोरोनावर कोणीही राजकारण करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. रुग्ण वाढत असल्यानं कोरोनासंदर्भात कडक निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येण्याचे संकेत अजित पवार यांनी दिलेत.

अजित पवार उद्या  मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, या बैठकीत कोरोनासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थ आणि नागरिक मास्क वापरत नाहीत. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असून, उद्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोरोनासंदर्भात कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिलाय.

काही लोक कोरोनाबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी शिवजयंतीला बंधन का आणता अशी टीका केली. पण कोरोना वाढतोय, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये, असंही अजित पवार म्हणालेत. 

कोरोना पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना दिलाय.