WhatsApp मध्ये बग

मुंबई: जगभरात इन्स्टंट मेसेजिंग म्हणून लोकप्रिय ऍप मोबाईल युजरना धोकादायक ठरत आहे. WhatsApp मध्ये युजर्सना सातत्याने नवनवे फीचर्स जरी मिळत असले तरी अनेक उणिवादेखील समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा व्हॉट्स अ‍ॅपमध्ये एक धोकादायक ‘बग’ असल्याचं समोर आलं आहे. यामुळे हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून अ‍ॅप क्रॅश करु शकतात. एकदा अ‍ॅप क्रॅश झाल्यानंतर तुम्हाला अ‍ॅप अनइंस्टॉल करुन पुन्हा डाउनलोड करण्याशिवाय पर्याय नसेल.सायबर सिक्युरिटी फर्म चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी हा बग शोधला आहे. ग्रुप चॅटमध्ये टाकलेल्या एका मेसेजमुळे एकाचवेळी अनेक स्मार्टफोनमधील अ‍ॅप क्रॅश होऊ शकतात इतका खतरनाक हा बग असल्याचं चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी म्हटलंय. याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण अनेक लोकांसाठी संपर्क साधण्याचा किंवा संभाषणाचा व्हॉट्सअ‍ॅप मुख्य मार्ग आहे.