
पुणे ताथवडे रस्त्याची दुरुस्ती रखडली.
बालाजी कॉलेज ते व्हिजन वन मॉलपर्यंतचा रस्ता विद्युत वाहिनी टाकण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी खोदला. त्यानंतर आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. हा रस्ता वर्दळीचा आहे. शेजारी पादचारी मार्गही नाही. हे काम त्वरित पूर्ण करावे.
पदपथ नक्की कोणासाठी
ना. गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या रस्त्यावरही आता जंगली महाराज रस्त्यासारखे प्रशस्त पदपथ होणार आहेत. त्याचा फायदा नागरिकांना होणार, की अशा अनधिकृत विक्रेत्यांना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पालिका जागी होणार का?
स्वच्छतागृहाची दुरवस्था
येथील भोसलेनगर बागेत परिसरातील सर्वच वयोगटातील रहिवासी फिरायला येतात; परंतु येथील स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे येथे फिरू नये, असेच वाटते. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहेच; परंतु येथे पाणीही नसल्याने ही समस्या गंभीर झाली आहे. कार्यवाही करावी.
कचरा जातोय जाळला नऱ्हे रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ सिंहगड फार्मसी कॉलेजच्या गेटजवळ सतत कचरा जाळला जातो. कचरा जाळण्यास असलेली बंदी सर्रास धुडकावली जाते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. महापालिकेने लक्ष ठेवून कारवाई केल्यास हे प्रकार थांबतील.









