चीनमध्ये इन्फ्लूएंझा (Influenza) आणि कोरोना (Corona), ओमायक्रोनची वर्षपूर्ती

दक्षिण चीनमध्ये (South China) साथीचा आजाराच्या उद्रेकामुळे औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा (Medicine Shortage in China) निर्माण झाला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी इन्फ्लूएंझा (Influenza) आणि कोरोना (Corona) , या दोन्ही आजाराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. एक सरकारी माध्यम अहवालात, सोमवारी ही माहिती देण्यात आली.

ग्लोबल टाइम्सने दिलेल्या अहवालानुसार तज्ज्ञांनी सांगितले की, सतत कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपायांमुळे कमकुवत झालेली सामूहिक प्रतिकारशक्ती इन्फ्लूएंझा आजार वाढण्यासाठी जबाबदार असू शकते. इन्फ्लूएंझा ग्रस्त लोकांची संख्या हिवाळ्याच्या तुलनेत खूप जास्त आहे. जेव्हा संक्रमण अधिक वेगाने पसरते तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते. हे चिंताजनक आहे, असे डॉक्टर आणि तज्ञ म्हणाले आहेत.

ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, चायनीज नॅशनल इन्फ्लुएंझा सेंटर (CNIC) च्या ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, 4 एप्रिलपासून 19 जूनच्या दरम्यान 17 प्रांतांमध्ये इन्फ्लूएंजाचे 507 प्रकरण समोर आली आहे. त्यात 503 दक्षिण चीनमध्ये आहेत. 2021च्या 136 प्रकरणांच्या तुलनेत आताची संख्या खूप जास्त आहे. फ्लूच्या बळींची संख्या 10 किंवा त्याहून अधिक पोहोचते तेव्हा इन्फ्लूएंझाचा उद्रेक झाला आहे, असे म्हटले जाते.

साधारण 2019 च्या अखेरीस कोरोना विषाणूनं चीनवाटे (China) संपूर्ण जगात थैमान घालण्यास सुरुवात केली. चीनच्या वुहान (Wuhan) शहरात कोरोनानं हातपाय पसरले आणि बघता बघता संपूर्ण जगाला या विषाणूनं विळख्यात घेतलं. हे संकट लसीकरणानंतर (Corona Vaccination) तरी टळेल अशी शक्यता असतानाच तसं काहीच होताना दिसलं नाही. आता सलग चौथ्या वर्षात म्हणजेच 2023 मध्येही हा विषाणू अचडणींची परिस्थिती निर्माण करणार असल्याची चिन्ह आहेत. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं यासंदर्भातील इशाराही दिला आहे.

WHO चे महासंचालक टेड्रोस अदनोम घेब्येयियस यांनी शुक्रवारी कोरोनासंदर्भात काही गोष्टी सांगत पुन्हा जगाचं लक्ष वेधलं. यंदाच्या वर्षी COVID-19 ला थोपवण्याच्या रणनितींमध्ये दिसून आलेल्या एका त्रुटीमुळे एका नव्या व्हेरिएंटच्या निर्मितीची स्थिती तयार करत आहे. सध्याच्या घडीला (Corona precautions) नियमांमध्ये आलेली शिथिलता, लसीकरणाविषयी नसणारं गांभीर्य आणि तत्सम परिस्थितीमुळं हे संकट ओढावू शकतं असतं मत जागतिक आरोग्य संघटनेकडून मांडण्यात आलं.

तरीही कोरोना गेलेला नाही . . . 

‘या महामारीची धोकादायक पातळी आता संपुष्टात येण्यच्या मार्गावर आहे असं म्हणण्याच्या आपण बरेच जवळ आहोत. पण, अद्यापही आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही’, असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर जोर दिला. लसीकरणामध्ये जागतिक स्तरावर असणाऱ्या अंतराविषयी सांगत चीनसोबतच संपूर्ण जगात सहव्याधी असणाऱ्या आणि 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात आरोग्य संघटनांनी जावं असा आग्रही सूर टेड्रोस यांनी आळवला.

कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूची मागील आठवड्यात वर्षपूर्ती झाली. संपूर्ण जगात या विषाणूची दहशत पाहायला मिळाली. यामध्ये WHO प्रमुखांनी ओमायक्रॉन हा डेल्टाहून अधिक झपाट्यानं पसरणारा व्हेरिएंट असल्यासं स्पष्ट केलं.