ऑस्ट्रेलियन ओपन: फेडरर दुसऱ्या फेरीत

मेलबर्न: वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात झाली.  सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या ३८ वर्षाच्या फेडररने पहिल्या फेरीत स्टिव्ह जॉनसन याचा ६-३, ६-२, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. फेडररने आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवून २१व्या ग्रँड स्लॅमचे स्वप्न साकारण्याचा फेडररचा प्रयत्न असेल.स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने २० वर्षापूर्वी या स्पर्धेत पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने पहिल्या फेरीत कधीच पराभव स्विकारलेला नाही. 

पुरुष एकेरीमध्ये सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच या वेळी विक्रमी आठव्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील असून, महिला एकेरीमध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी खुणावत आहे.