मुंबई इंडियन्स आय पी एल क्रिकेट स्पर्धेत चौथ्यांदा चॅम्पियन

अत्यंत चुरशीच्या झालेल्या आय पी एल 2019 अंतिम सामन्यात रोहित शर्मा च्या मुंबई इंडियन्स ने धुरंदर धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघावर एका धावाने रोमहर्षक विजय मिळवला आणि आय पी एल 2019 चषकाला गवसणी घातली. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि निर्धारित वीस षटकामध्ये आठ बाद 149 अशी धावसंख्या उभारली. प्रथमदर्शनी पाहता धोनीचे धुरंधर सहज हे आव्हान पार करतील असेच वाटले होते परंतु अंतिम षटकात वॉटसन बाद झाला आणि विजय चेन्नई च्या हातून निसटला.

मुंबईने आयपीएल च्या इतिहासात चौथ्यांदा चषक पटकाविला आणि क्रिकेट मधील आपली दादागिरी स्पष्ट केली.