
नमस्कार मित्रांनो, १० वी नंतर कलाक्षेत्रात भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या मराठी बांधवांसाठी मी ३ + २ वर्षे असा एक पदवी मिळवून देणारा अभ्यासक्रम एका स्वायत्त विद्यापीठासाठी तयार करीत आहे. त्यास तत्वतः मान्यताही मिळालेली आहे. यातील पहिले तीन वर्षे पंतप्रधानांच्या कौशल्याधारे अभ्यासक्रमांवर आधारीत आहेत. त्याचे १ले वर्ष मूलभूत हस्तकौशल्यावर आधारीत फाऊंडेशन सर्टिफिकेट कोर्स, २रे वर्ष अप्लाईड किंवा पेंटिंग स्पेशलायझेशन – टूल्स व टेक्निक्स+बेसिक असाईनमेंटस् स्पेशलायझेशन मधील+ड्रॉईंगसह १२वी परीक्षेची तयारी+एन्.आय्.डी, आय्.डी.सी.,सी.ई.ई.डी.सारख्या परीक्षेची पूर्वतयारी असा डिप्लोमा कोर्स व तिसऱ्या वर्षी प्रोजेक्ट, कॉम्प्युटर स्कील्स, डेझर्टेशनसह एडव्हान्स डिप्लोमा कोर्स.
तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाच्या बी.ए. एनिमेशन व डिजिटल आर्ट अभ्यासक्रमास प्रवेश. म्हणजे केवळ पाच वर्षात हस्तकौशल्यासह संगणकाधारे पदवी मिळविण्याची संधी देणारा हा अभ्यासक्रम राहणार आहे. आत्ताच्या पदवी अभ्यासक्रमास १२वी नंतर प्रवेश मिळतो म्हणून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे ड्रॉईंगचे हस्तकौशल्य तितके चांगले नसते. चांगले ड्रॉईंग असणाऱ्यांचा उत्साह व कौशल्य १२ करताना दोन वर्षात संपूष्टात येण्याची शक्यता असते.
ड्रॉईंगची तयारी करुन घेणाऱ्या खाजगी व कॉर्पोरेट क्लासेस विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी घेतात. या सर्व गोष्टींचा विचार करुन हा अभ्यासक्रम तयार केला जात आहे. एक कलाकार किंवा कलाप्रेमी म्हणून आपल्या काही सूचना असल्यास त्या जरुर कळवा. सुयोग्य सुचनांचा जरुर आदर केला जाईल. धन्यवाद.
प्रा. डॉ. सुभाष पवार, पुणे











