भारतीय रेल्वेनं सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड

नवी दिल्ली: देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आता रेल्वेच्या डब्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरीत केलं आहे. पश्चिम रेल्वेकडून वर्कशॉपमध्ये 28 डब्यांत प्रायोगिक स्वरुपातील आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. गरज पडल्यास असे 3 लाख आयसोलेशन बेड होऊ शकतात. रेल्वेच्या 28 नॉन एसी कोचचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केलं आहे. वर्कशॉपमध्ये पाच आणि एएमव्हीमध्ये 5 कोच आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. दोन्ही वर्कशॉप्स प्रोटोटाइप कोच फायनल स्टेजमध्ये आहेत. 28 कोच 6 एप्रिलपर्यंत तयार करण्यात येतील.

कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे. सोबतचं कोरोना संशयितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी सरकारी आणि खासगी रुग्णालये कमी पडत आहे. शिवाय कोरोना संशयित रुग्णांना घरातचं कॉरंटाईन करणे धोक्याचं आहे. यावर भारतीय रेल्वेने उपाय शोधला आहे. बंद पडलेल्या रेल्वेच्या डब्याचे रुपांतर त्यांनी रुग्णालयात केलं आहे.