भावनिक आवाहन: गरज आहे तुमच्या मदतीची; निवासी डॉक्टरांच्या N95 मास्क आणि PPE किट्स उपलब्ध करण्याकरिता निधी संकलन


MARD (मार्ड) या निवासी डॉक्टर संघटनेमार्फत दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांना N95 मास्क तसेच covid19 पी पी ई (Personal Protection Equipment) किट दान (Donation) स्वरूपात उपलब्ध करून देण्याकरिता आवाहन केले आहे. सरकार कडून प्रयत्न होत आहेत तरी सुदधा आवश्यक साधन सामग्रीचा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तुटवडा भासत असल्याचे सांगितले.
आम्ही प्रगती फौंडेशन मार्फत रक्त दान शिबिर , मुख्यमंत्री फंडासाठी निधी संकलनआणि गरजूंना अन्न धान्य वाटप असे विविध कार्यक्रम राबवित आहोत.


आता डॉक्टरांच्या वरील आवाहणास प्रतिसाद देऊन N95 व PPE किट्स संस्थेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याकरिता तुम्हां सर्वांकडून सढळ हस्ते मदतीची गरज आहे. तरी तुम्हांला आवाहन करण्यात येत आहे की खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कृपया संस्थेला वरील सामग्री खरेदी करण्यासाठी दान (Donation) करावे. आज आपण जर का या डॉक्टर रुपी देवदूताना मदत केली तरच ते आपल्या रक्षणासाठी निर्भीडपणे covid19 (कोरोना) विरुद्धच्या युद्धात समर्थपणे तोंड देऊ शकतील.
आज तुमच्या मदतीची गरज आहे… फक्त लाईक्स करू नका तर प्रत्येक्ष कृती करा.


मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे निराश करू नका..
Donation करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा.
सोबत MARD चे पत्र जोडले आहे.

अधिक माहिती करीता
www.pragateefoundation.org
Pragatee Foundation

कृपया हा संदेश तुमच्या संपर्कातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांना फॉरवर्ड करावा ही विनंती.