मद्यविक्री बंदीमुळे १६७ कोटी रूपयांचा महसूल बुडाला

पुणे- गेल्या महिनाभरापासून शहरासह जिल्ह्य़ात मद्यविक्री बंद आहे.

त्यामुळे पुण्यातून दरमहा राज्य शासनाकडे जमा करण्यात येणारा तब्बल १६७ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत दुकान चालकांची मागणी होत आहे.

मात्र,राज्य शासन किंवा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिल्याशिवाय मद्यविक्रीची दुकाने सुरू करता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने दिले आहे.