नेरूळच्या डी वाय पाटिल रुग्णालयातील कंत्राट दाराच्या मुजोर पणाचा कळस 50 कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले

नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे यांचा कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा

नवी मुंबई; नेरूळ नवी मुंबईच्या डी वाय पाटिल रुग्णालयातील एक्सीमिस प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट दाराच्या अंतर्गत काम करणारे जवळपास पन्नास मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कंपनीच्या मुजोर पणाचा कळस म्हणजे कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली असताना 50 कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले आहे.

डी वाय पाटील रुग्णालयात एक्सिमिस प्रायवेट लिमिटेड या कंत्राट दाराचे कंत्राट असून त्यात सुमारे 220 कामगार काम करतात.

सदर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारल्यामुळे सदर कंत्राट दाराने सुमारे 50 कामगारांना दिनांक 23/4/2020 पासून संघटना मोड़ित काढण्यासाठी काम न देता नोटिस फलकावर उद्दामपणे सूचना लावली की कामावर गैरहजर किंवा बेकायदेशीर संप केलेल्या कामगारांचे पगार कपात करुन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले जातील असे शब्द वापरून कोविड -19 च्या या माहामारीच्या संकटात सापडलेल्या कामगारांची एकप्रकारे कुचेष्टा केली आहे.

सदर बाब कामगारांनी नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्या सहकार्याने ही बाब कामगार मंत्री श्री दिलीप वळसे पाटिल ,कामगार उपायुक्त श्री भोसले , सहाय्यक आयुक्त श्री राजेश आड़े तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नेरूळ यांना पत्रव्यवहार करुन कळवली आहे.

डी वाय हस्पिटलचा मुजोर कंत्राटदार अजूनही कामगारांना कामावर घेत नाही कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे हे कामगारांसाठी कोरोनाच्या या संकटकाळातही मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.