
नायगांव,नांदेड – अवैद्य दारू विक्रीला व घुटखा,यासह सर्व अवैध धंद्याला पाठबळ देणाऱ्या पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांची बदली करा,व त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे मराठा महासंग्राम संघटनेचे पदाधिकारी विक्रम पाटील बामणिकर व अन्य पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरासह राज्यात लॉक डाउन करण्यात आले आहे. यात सर्वच प्रकारची दारू दुकाने गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत प्रत्यक्षात दारू दुकाने बंद असली तरी दारू विक्रीचा काळाबाजार मात्र नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विविध ब्रँडची दारू दुप्पट तिप्पट भावात विक्री केली जात आहे .मात्र याकडे स्थानिक पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे दारू विक्री करणाऱ्या कडून आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा तालुक्यात खुले आम चर्चिली जात आहे.
सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील नायगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होलसेल गुटखा विक्रेते असून याकडे देखील कोणतीच कारवाई होत नसल्याचे दिसून येते आहे व अनेक वेळा मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अन्न औषध विभाग नांदेड राज्य उत्पन्न विभाग नांदेड यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आली पण कुठल्याच प्रकारे यावर कार्यवाही करण्यात आलेले नाही त्यासाठी अवैद्य दारू विक्री व गुटखा विक्री करणाऱ्यांना पाठीशी घालत त्यांना पाठबळ देणाऱ्या स्थानिक पोलिस निरीक्षक यांची तात्काळ बदली करून त्याठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी देण्याच्या मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
दिलीप वळसे-पाटील राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र मंत्रालय मुंबई यांनी महाराष्ट्रामध्ये गावठी देशी व विदेशी दारू आणि बेकायदेशीर दारू विक्री होत असेल तर त्याची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे करावी अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करावी अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिल्याचे दिलीप पाटील वळसे राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले तरीपण नायगाव शहरात अवैद्य दारू व गुटखा विक्री असतानादेखील नांदेडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने व स्थानिक पोलिस निरीक्षक यांनी आर्थिक व्यवहारापोटी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने वतीने करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे नायगाव शहरात प्रत्येक ठिकाणी फोनवर दारू मिळत व विक्री होत आहे तर गुटका मात्र होलसेल विक्रेत्याच्या घरून मोठ्या ग्रामीण भागातील किराणा दुकानदार व पानपट्टी विक्रेता घेऊन जात आहेत व विक्री घरातून करीत आहेत.असा प्रकार होत असताना सर्वत्र दिसून येत आहे यावर देखील कुठलीच कारवाई होत नाही असेही निवेदनात म्हटले आहे.
तरी पोलीस अधीक्षक साहेब यांनी या व्यवसायाला पाठबळ देणाऱ्या पोलिस निरीक्षकाची तात्काळ बदली करून नायगाव पोलीस स्टेशन येथे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुबांड स्वाक्षऱ्या आहेत.






