
मनसे कामगार सेनेचा दणका
नेरूळच्या डी वाय पाटील रुग्णालयात एक्सिमिस प्रायवेट लिमिटेड या कंत्राट दाराचे कंत्राट असून त्यात सुमारे 220 कामगार काम करतात. रुग्णालयातील कंत्राट दाराच्या मुजोर पणाचा कळस म्हणजे 50 कामगारांना बेकायदेशीर कामावरून कमी केले होते.
सदर कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्विकारल्यामुळे सदर कंत्राट दाराने सुमारे 50 कामगारांना दिनांक 23/4/2020 पासून संघटना मोड़ित काढण्यासाठी काम न देता नोटिस फलकावर उद्दामपणे सूचना लावली की कामावर गैरहजर किंवा बेकायदेशीर संप केलेल्या कामगारांचे पगार कपात करुन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले जातील असे शब्द वापरून कोविड -19 च्या या माहामारीच्या संकटात सापडलेल्या कामगारांची एकप्रकारे कुचेष्टा केली होती.
सदर बाब कामगारांनी नवी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री अप्पासाहेब कोठुळे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांच्या सहकार्याने ही बाब कामगार मंत्री श्री दिलीप वळसे पाटिल ,कामगार उपायुक्त श्री भोसले , सहाय्यक आयुक्त श्री राजेश आड़े तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नेरूळ यांना पत्रव्यवहार करुन कळवली आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडली.
मनपा कामगार सेनेचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे यांना कळताच , महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर व आप्पासाहेब कोठुळे यांनी कामगारांची बाजू कंपनी प्रशासनाकडे परखडपणे मांडल्यानंतर आज सर्व 50 कामगारांना कामावर रुजू करून घेतले कामावर रुजू करताना EMG कंपनीने कामगारांचा पगार कपात करणार नाही असे लेखी पत्र दिले आहे.

डी वाय पाटील हॉस्पिटलमधील कामगारांच्या लढ्यासाठी कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर, मनपा कामगार सेनेचे अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, चिटणीस गजानन ठेंग यांनी अथक परिश्रम घेतले व सर्व कामगारांनी एकजूट दाखवली .
याबाबतचे वृत्त युवा प्रगतीने दिले होते त्याबद्दल अप्पासाहेब कोठुळे यांनी आभार मानले.







