Corona Update: राज्यात ४४० नवीन रुग्ण,१९ मृत्यु ; एकूण रुग्ण संख्या ८०६८.

नवी मुंबईत कोरोनामुळे एका पोलिसाचा मृत्यू

मुंबई – राज्यात दिवसभरात १९ कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर ४४०  रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनबाधित रुग्णांची संख्या ८०६८  वर पोहोचली आहे. तर ११२ रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंत एकूण ११८८  रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी गेले आहेत.

आज मृत्यू झालेल्या १९ पैकी मुंबई येथील सर्वाधिक १२ , पुणे महापालिका हद्दीतील ३ , जळगावातील २ आणि सोलापूर आणि लातूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

या मृतांमध्ये ११ पुरुष आणि ८  महिलांचा आहेत. या पैकी ७ रुग्ण ६० वर्षांपुढील होते. तर अन्य १० जण ४०  ते ५९ वर्ष वयोगटातील, तर दोघे ४० वर्षांखालील आहेत.

१९ मृतांपैकी ४ जणांच्या इतर आजाराची माहिती मिळू शकली नाही. उर्वरित १५ पैकी ११ जणांना ७० टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग असे गंभीर आजार असल्याचे आढळून आले. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ३४२  बळी गेले आहेत.

आज राज्यभरात एकूण १,१६,३४५ नमुन्यांपैकी १,०७,५१९ रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आले. तर ८०६८ नमुने पॉझिटिव्ह आहे. सध्या राज्यात १,३६,९२६  नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर ९१६०  नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी; नवी मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू

करोनाचा विळखा वाढत असताना त्याविरोधात समोर ठाकलेले डॉक्टर्स आणि पोलिसांना याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.

राज्य पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा यापूर्वी करोनामुळं मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नवी मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे वसाहतीमध्ये राहणारे ५३ वर्षीय पोलीस कर्मचारी दररोज मुंबई ते कामोठे असा एसटी प्रवास करुन कर्तव्य बजावत होते.

त्यांना प्रवासादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.त्यांना यापूर्वी कर्करोग होता अशी माहितीही समोर आली आहे.दरम्यान,रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

नवी मुंबईतील अपडेट

आज नवी मुंबई मध्ये 23 कोरोनाबधित रुग्ण आढळले
नवी मुंबई त एकूण टेस्ट 1953
पोसिटिव्ह 131
निगेटिव्ह 1327
अहवाल प्रलंबित 495
विभागवार
बेलापूर 9
नेरुळ 4
वाशी 2
तुर्भे 4
कोपरखैरणे 2
घणसोली 2

आज वाढलेले नवी मुंबईत कोरोनाबधित रुग्ण एकूण 23