माकडांनाही समजलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व… आपल्या लोकांना कधी कळणार……?

अरुणाचल प्रदेश – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार त्यांच्या संदेशात याचं महत्त्व सांगितलं आहे.

अशात देशात काही ठिकाणी मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. त्यावरुन वारंवार ताकीदही दिली जाते. पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांना विविध प्रकारच्या शिक्षाही करुन झाल्या आहेत.

अशात माकडांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळल्याची घटना समोर आली आहे.

ज्यांना सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व अजूनही समजलेलं नाही त्यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट केलेला हा फोटो पहावा.

अरुणाचल प्रदेशातला हा फोटो आहे. काही माकडं रस्त्यावर ठराविक अंतर सोडून बसली आहेत आणि कलिंगड खात आहेत असा हा फोटो आहे.