
वनप्लस फ्लॅगशिपच्या लाँचिंगच्या वेळी, अनेक चाहत्यांनी अशी अपेक्षा केली होती की स्वस्त वनप्लस 8 लाइटला देखील लाँच केलं होईल. मात्र, चाहत्यांच्या पदरी निराशाच आली.
वनप्लस ही स्मार्टफोन कंपनी लवकरच स्वस्तातला स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या फोनची किंमत वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रोपेक्षा कमी असेल. वनप्लस झेड असं या फोनला नाव दिलं आहे. कंपनी जुलैमध्ये हा फोन बाजारात आणणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
वनप्लस ८ सिरीजसाठी भारतात प्री-बुकिंग सुरू करण्यात आली आहे. ही माहिती कंपनीने दिली आहे. यात ग्राहक वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो या दोन्ही मॉडेल साठी प्री-बुकिंग करू शकतात.











