महाराष्ट्रात सगळीकडे तळीराम, सोशिअल डीस्टणसिंगची ऐसी तैशी…

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तळीरामांच्या गर्दीमुळे दारू दुकाने बंद

मुंबई येथील सायन कोळीवाडा परिसरात सामाजिक अंतराची ऐशी की तैशी पाहायला मिळाली. तळीराम अक्षरशः गोंधळ घालताना दिसले. दारुसाठी झुंबड उडाली होती.

मुंबई,पुणे,कोल्हापुर,नागपुर,नाशिक,विरार,डोंबिवली अशा अनेक ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून दारू दुकानांसमोर तळीरामानी केली होती गर्दी .

अनेक ठिकाणी दारू दुकाने सुरु झाल्यावर तळीरामानी सामाजिक अंतरांचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी दारू दुकाने केली बंद.

बेळगावात मद्य दुकान उघडल्यावर पहिल्या ग्राहकाला हार घालून स्वागत करण्यात आले,ग्राहक देवो भव!