
एकीकडे कोरोनाशी लढत असताना जवानांना दोन्ही आघाड्यावर लढा द्यावा लागत आहे. रविवारी हंदवाडामध्ये मोठी चकमक उडाली. 28 एप्रिलला जवानांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. रविवारी शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 21 राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि दाहशतवाद्यांमध्ये मोठी धुमश्चक्री उडाली. यात कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नायक राजेश, लांस नायक दिनेश आणि जम्मू-कश्मीर पोलीसचे सब इंस्पेक्टर काजी पठान शहीद झाले.

जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. हंदवाडा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 3 जवान शहीद झाले आहेत, तर 7 जवान गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या 24 तासात झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला असून कर्नल, मेजरसह 8 जवान शहीद झाले आहेत.
सोमवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश मिळाले. मात्र हिंदुस्थानने 3 जाबाज जवान गमावले. सीआरपीएफची संतोष मिश्रा, चंद्रशेखर आणि अश्विनी कुमार यादव ही तीन जवान शहीद झाली आहेत. याआधी रविवारी दाहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले होते, तर 2 दहशतवादी ठार करण्यात यश मिळाले होते.











