
औरंगाबाद – आज पहाटे करमाड शिवारात रेल्वे पटरिवर झोपलेले 14 मजूर जागीच ठार. एकूण 19 मजूर झोपले होते भरधाव मालगाडी खाली आल्याने ही दूरघटना घडली.

गावी जायचं आहे म्हणून रेल्वे पटरीवरून चालत जवळपास 19 मजदुर चालले होते. प्राथमिक माहितनुसार हे सगळे मजदुर बेकायदेशीर रित्या औरंगाबाद किंवा भुसावळ रेल्वे स्टेशन वर जाणार होते. रात्री आराम करावा म्हणून ते पटरीवर झोपले होते. गाढ झोपेत असताना पहाटे एक भरधाव मालगाडी त्यांच्यावरून गेली आणि 14 मजूर जागीच ठार झाले. दोन जखमी असून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. इतर जण पटरी सोडून थोडे लांब झोपल्यामुळे वाचले आहेत. त्यांच्यावर जबरदस्त मानसिक आघात झाला असून त्यांची कन्सिलींग सुरू आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.











