मुंबईच्या आयुक्त पदावरून प्रवीण परदेशी यांची हकालपट्टी: “आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली सरकार व प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव उघड”- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

मुंबई दि. ८ मे- आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली हा मार्ग नव्हे, गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे जे चित्र आहे, आजची बदलीही हे मूर्तिमंत उदाहरण आहे.

कोरोनो रोखण्याच्या दृष्टीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याची बाब कालच्या व्हिडीओ कॉन्फरसिंमध्ये आम्ही सरकारच्या निर्दशनास आणून दिली. अजय मेहता व प्रविण परेदशी यांच्यामधील युध्दाचा अंत झाला आहे की मध्यंतर झाला आहे याची मला कल्पना नाही पण या निमित्ताने प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे.

सरकार व सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य व्यवस्था कमकुवत झाली आहे. ज्यावेळी आपत्तीजनक परिस्थिती असते त्यावेळी सरकारी अधिकी-यांची बदली करण्याची परंपरा नाही. कोरोनो च्या परिस्थितीत मंत्रालय व महापालिका आयुक्त स्तरावर घेतलेल्या निर्णयामुळे यामध्ये मतभेद निर्माण झाले.

त्यामुळे या कोरोनाच्या संकटमय परिस्थितीत सरकार व प्रशासन यामधील अंतर्गत विसंवाद उघड झाला असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.