धारावी कोळून प्यायलेला अधिकारी मुंबई महापालिका आयुक्तपदी, कोण आहेत इक्बाल चहल?

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आलं आहे. मुंबईतील कोरोनावर नियंत्रण न मिळवल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण परदेशींच्या जागी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या इक्बाल चहल हे नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत. मात्र त्यांचा धारावीतील कामाचा अनुभव सध्या तिथला कोरोनो रोखण्यासाठी कामी येतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इक्बाल चहल यांनी म्हाडाचे अध्यक्ष, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.

इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट असलेले आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. इक्बाल चहल यांनी यापूर्वी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिलं आहे.


इक्बाल हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव आणि ओसडी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. इक्बाल चहल हे औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही होते.


शिवाय त्यांनी उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून काम पाहिलं
म्हाडाचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. इक्बाल यांचं शिक्षण राजस्थानातील जोधपूर इथं झालं आहे.
इक्बाल चहल हे शारिरिकदृष्ट्या फिट अधिकारी म्हणून ओळखले जातात. इक्बाल चहल हे 2004 पासून सलग मुंबई मॅरोथॉनमध्ये सहभागी होत आहेत.