
मुंबई – विधानपरिषदेच्या निवडणुकीत किती जागा लढवायच्या या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा चढला होता. कुणी किती जागा लढवायचा यावरुन सत्ताधारी महाविकासआघाडीत तणाव निर्माण झाला होता. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध निवडणुकीसाठी आग्रही असताना काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मोठा पेच तयार झाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरें नाराज होते.
महाविकास आघाडीची तातडीची बैठक आज सायंकाळी झाली त्या बैठकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत यांच्यासह शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, संजय राऊत हे उपस्थित होते.
तब्बल दीड तासांच्या खलबता नंतर कॉंगेसने आपला अट्टहास सोडून महाविकास आहाडी ५ जागांवर निवडणूक लढवणार आहेत अस जाहीर केल आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपण १ उमेदवार मागे घेत असल्याच सांगितल आहे.
त्यामुळे उद्या महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार आहेत.










