प्रगती फौंडेशन मार्फत आदिवासी भागातील न्यू इंग्लिश शाळा आंबोली तालुका जुन्नर दत्तक

शाळेला डिजिटल क्लास रूम करण्याकरिता दोन संगणक संच भेट देण्याची घोषणा. . . दहावी च्या विध्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष किरण राणे, सचिव नरेंद पाटील, विश्वस्त कायदेशीर सल्लागार अडव्होकेट एस ए पटेल यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विध्यार्थाना प्रवेश पत्र आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले. डिजिटल साक्षरतेचे मिशन हाती घेऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून संस्थेमार्फत डिजिटल क्लास रूम ची निर्मिती करण्यात येणार आहे.