तब्बल १० हजार ८७७ पुणेकरांनी केली ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी

पुणे – मद्य विक्रीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मद्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा पुणेकरांनी चांगलाचं लाभ घेतला आहे.

काल पहिल्याच दिवशी पुणेकरांनी हायटेक फंडा वापरत ई टोकन घेतलं. तब्बल १० हजार ८७७ पुणेकरांनी ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी केली आहे. यामुळे आता दुकानासमोर लागणाऱ्या रांगा देखील कमी होणार आहेत.

मद्यप्रेमींसाठी ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घेणे आवश्यक आहे.

या उपाययोजनेमुळे मद्यप्रेमींचा रांगेत ताटकळत उभं राहण्याचा त्रास टळणार आहे.