केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा स्वदेशीचा नारा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी २० लाख करोडचं आर्थिक पॅॅकेज जाहीर करत देशात लॉकडाऊन वाढणार असल्याचे घोषित केले. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मोठी घोषणा केली आहे.

सर्व केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. हा निर्णय १ जूनपासून अंमलात आणला जाणार आहे.

यामुळे १० लाख केंद्रीय अर्धसैनिक दलातील सुमारे ५० लाख कुटुंबे केवळ २८०० कोटी रुपयांची देशी उत्पादने खरेदी करतील, अशी घोषणा अमित शहा यांनी केली आहे.

काल पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. लोकांना जास्तीत जास्त स्वदेशी वस्तुंचा वापर करण्यास सांगितले होते. यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात भारत जगाचे नेतृत्व करू शकेल, असेही शहा यांनी सांगितले.