
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे ई – पासची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेद्वारे नागरिकांना पास मिळण्यास काही अडचणी असल्यास त्यासाठी श्याम लाखे – 9423301919, राजेश्वर राठोड – 9673564496, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखा दूरध्वनी क्रमांक 02362- 228608, आस्थापना शाखा 02362- 229000 हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या क्रमांकांवर संपर्क साधून नागरिकांनी ई-पास विषयीची माहिती प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.











