
नेरूळ येथील शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष पाटील आणि उपशाखा प्रमुख कुणाल निरभवणे यांचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गर्शनाखाली स्तुत्य उपक्रम
नवी मुंबई: मागील काही दिवसांपासून सात्यात्याने नवी मुंबईतील नेरूळ विभागातील शिवसेना कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्या मार्फत कोरोनाच्या या संकट काळात गराजुंसाठी विविध सामाजिक उपक्रम सुरू आहेत. मदत नसून कर्तव्य समाजसेवेचा वसा या धोरणाचा अवलंब करून गरजूंना सतत मदत केली जात आहे.

आज कर्तव्याचा पाचवा दिवस असून आजही जवळपास तीनशे गरजूंना अन्न व पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
याबाबत माहिती देताना उपविभाग प्रमुख संतोष पाटील यांनी सांगितले की, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या शिकवणी नुसार तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या तत्वानुसार कोणीही गरीब जनता उपाशीपोटी राहू नये. तसेच आमचे आवडते उपनेते विजयजी नाहटा साहेब यांच्या प्रेरणेने शिवसेना शाखा क्र. ९२\९९ वतीने रोजच ३०० लोकांना जेवण व पाणी मोफत सेवा उपलब्ध करुन देत आहेत तसेच गावच्या ओढीने आपल्या गावी निघालेल्या लोकांना बस ने सोडण्याचे काम NMT चे ड्रायव्हर आपले घर सकाळीच सोडत आहेत त्यांना आजही जेवण पाणी वाटप करण्यात आले.

यावेळी युवासेना अधिकारी सुमित खरात, शिवसैनिक मंगेश शिंदे, मयूर जंगम,संभाजी कांबळे, आतिष कदम, सचिन कांबळी, अरबाज सैय्यद, रोहित पाशिलकर,रोशन खाडे, संदीप गजमेव आदी पदाधकाऱ्यांनीही मदत कार्यात सहभागी झाले होते.












