भाईजान सलमानने मुंबई पोलिसांना दिल्या एक लाख सॅनिटायझर बॉटल्स

मुंबई – सध्या या लॉकडाऊनमध्ये सलमान खान आपल्या पनवेल येथील फार्महाऊसवर आहे. तेथूनच त्याने त्याच्या नवीन कंपनीची माहिती दिली होती.

आज या ‘फ्रेश’ (FRSH) कंपनीच्या एक लाख सॅनिटायझरच्या बाटल्या त्याने मुंबई पोलिसांसाठी दिल्या आहेत.

महाराष्ट्र सीएमओच्या ट्विटर हँडलवर याची नुकतीच घोषणा करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या देणगीबद्दल सलमानखानचे आभार मानले आहेत.

सलमानच्या या औदार्याबद्दल त्याच्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे.

या लॉकडाऊनमध्ये सलमानचे काम जोरात सुरु आहे. फ्रेश या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौदर्य प्रसाधने असे अनेक प्रॉडक्ट लवकरच बाजारात येतील. परंतु, सध्याच्या करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे.