Lockdown 5.0: धार्मिक स्थळे, हॉटेल,मॉल आठ जूनपासून उघडणार, ३० जून पर्यंत फक्त कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल

गृहमंत्रालयाकडून नवीन मार्गदर्शकतत्वे जारी

लॉकडाउन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.

लॉकडाउन आता फक्त कंटेनमेंट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.

३० जून पर्यंत फक्त कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल. धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल आठ जूनपासून उघडणार आहेत.