
केरळ सरकारची महाराष्ट्राला मोलाची मदत
मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर, औरंगाबादसह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या आता ७० हजार पार गेली आहे.
अशातच मुख्ममंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळ सरकारकडे मदतीची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन केरळ सरकारने महाराष्ट्राला मोलाची मदत केली आहे.
राज्य सरकारचं मुख्यालय नागपुरात शिफ्ट करावं-आशिष देशमुख महाराष्ट्र राज्य सरकारच्या विनंतीनंतर केरळ शासनाने १०० जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० जणांची पहिली टीम मुंबईत पोहोचली आहे.
कोरोनाविरोधातील लढ्यात आता महाराष्ट्रातील डॉक्टरांना केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होईल. केरळच्या डॉक्टर व परिचारिकांचे पहिले पथक सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री के. शैलजा यांनी दिली आहे. केरळच्या मोलाच्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आभार मानले.











