स्वदेशीचा नारा देणारे भारत सरकारच आता टिकटॉकवर !

नवी दिल्ली – स्वदेशी अभियानाअंतर्गत चायनिज उत्पादनाच्या बहिष्काराची मोठी लाटच देशभर उसळली.

सोशल मिडिया वरुन चायनिज उत्पादने देशाच्या अर्थव्यवस्थेला किती धोकादायक आहेत ह्या प्रकारचे संदेश फिरु लागले.

ह्यात सगळ्यात आघाडीवर होतं tiktok अॕप.

हजारो लोकांनी हे अॕप आपल्या मोबाईल मधून काढून टाकलं,पण तुम्हाला हे माहिती आहे का? भारत सरकारच स्वत:ची tiktok प्रोफाईल आहे.

भारत सरकार अधिकृतरित्या ह्या अॕपवर वावरत आहे. तिथे सरकारचे ८६३.६K इतके फॉलोवर्स आहेत.

देशभर स्वदेशीचा बोभाडा, सामान्य नागरिकांना टिकटॉकचा विरोध करायला लावून केंद्र सरकार स्वत: टिकटॉकवर व्हिडीओ अपलोड करत आहे.