
कॅनडाची वैभवशाली राजधानी-‐‐ ओटावा !
कॅनडाची राजधानी ओटावा ही ओटावा नामक सुप्रसिद्ध नदीच्या तीरावर आणि ऑन्टारिया व क्यूबेक प्रातांच्या सीमेवर नटून, थटून वैभवाची सर्व अलंकार लेवून वसली आहे.
ओटावा नदी ही कॅनडातील आठव्या क्रमांकाची विशाल नदी असून तिचा उगम लाॅटेंरियन पर्वतराजीतून झाला असून तेथून ती आजूबाजूची भूमी सुफलाम सफल करीत अव्याहत वाहात आहे.या नदीकाठी ओटावाची म्हणून खास संस्कृती आणि आर्थिक प्रगती बहरली आहे.या मध्ये या जीवनवाहिनी नदीचे फार मोठे योगदान आहे.
ओटावा हे राजधानीचे शहर कॅनडातील लोक संख्येनुसार चौथ्या क्रमांकाचे शहर आहे तर ऑन्टारियो प्रातांतील दुसरे मोठे शहर आहे.येथे 1.4 मिलियन लोकवस्ती आहे.राजधानीला आवश्यक असलेल्या सर्व बाबींची आखीव रेखीव अगदी बारीक गोष्टींची पुतर्ता केलेली आहे.नटवलेली आहे.त्यातूनच ही राजधानी निर्माण करणार्करणाच्या कल्पकतेची भव्य झेप लक्षात येते.
या नदी बाबत वाचन करीत असता Irish writer Oscar Wilde said at a public lecture in Ottawa in 1882, called the pollution of the Ottawa River ” an outrage” stating. ” No one has right to pollute the air and water which are the common inheritance of all.” He added ” we should leave lieve to our children as one have received them “.
ओटावातील सर्वात महत्वाची भव्य वास्तु म्हणजे पार्लमेंट हाऊस.या इमारतीवर एक स्वतंत्र लेखच लिहावयास लागेल.आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची एक पर्वणीच! तिची भव्यता मला तरी शब्दात करणे कठीणच आहे.समोरच्या भव्य हिरवळ असलेल्या प्रांगणात काही पायर्यांवर कलासक्त मंडळी आपली कला,संगीत,पथनाट्य, भांगडा नृत्य असेच लोकल मनोरंजनाच्या कार्यक्रम कुणालाही त्याचा त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन सादर करतात. काही आपल्याच सादरीकरणाचे व्हिडिओ तयार करतात. आजूबाजूलाच अॅटीक सादृश कॅनडा संस्कृती संबधित वस्तुंची शाॅप्स असतात.
त्यानंतर पार्लमेंट हाऊसला जोडूनच नॅशनल आर्ट गॅलरीची तितकीच दिमाखदार प्रेक्षणीय इमारत आहे.जोडूनच कॅनडायिन संस्कृतीचे प्राचीन इतिहासापासून ते आजवरच्या प्रगतीचे जे क्षितिज गाठले आहे ते दर्शविणारे राष्ट्रीय वस्तु संग्रहालय आहे.त्याचा जागतिक पातळीवर फार वरचा क्रमांक लागेल. परत या शांतताप्रिय कॅनडाने परकिय आक्रमकांना ज्या प्रकारे धीरोदात्त पणे यशस्वी पणे तोंड दिले त्याचा इतिहास सांगणारा वाॅर म्युझियम आहे.अशा अनेक विविध विषयांवरील कल्पकतेने निर्माण केलेल्या इमारती आहेत.
ओटावातील शैक्षणिक संस्थांची यादी तशी मारूतीच्या शेपटा सारखी वाढतच जाईल तरीही काहींचा उल्लेख करतो.येथे सुप्रसिद्ध ओटावा विद्यापीठ,कार्लटन विश्वविद्यालय, डाॅमीनिकन विद्यापीठ,लाॅ कालेजात,लेडीज काॅलेज आणि ऑगस्टिन काॅलेज यांचा जागतिक पातळीवर बोलबाला आहे.
ओटावातील अनेक प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. येथे बर्फाच्छादित काळ सोडला तर सतत पर्यटकांची वर्दळ असते.टोरांटोहून एक दिवसाची ट्रिप असते.फार चांगली माहिती देतात.
आता ओटावा पासून कोणती अमेरिकेतील प्रमुख शहरे ओटावा नदीवर पूल बांधून जोडली आहेत ते पाहू! सर्व प्रथम बोस्टन शहर जो अमेरिकेन इतिहासात बोस्टन टी पार्टी म्हणून प्रसिद्ध आहे.अमेरिकेतील वसाहतींनी एकत्र येऊन इंग्लंडला यापुढे कोणतेही कर भरणार नाही म्हणून चहाचे बाॅक्स समुद्रात बुडविले आणि अमेरिकेन स्वातंत्र्य लढा सुरू केला त्यालाच बोस्टन टी पार्टी म्हणतात.याचबरोबर न्यूयॉर्क ,फिलाडेल्फिया ही शहरे 709 k m अंतरावर आहेत. सात तासात जाता येते.या ओटावा नदीवर अनेक पुलांची निर्मीती झाली आहे.ज्यांनी ती केली त्यांच्या नावांने ते पूल ओळखले जातात. उदाहरणार्थ विल्यम माॅरीस या महापौरानी ऑगस्ट 1901 मध्ये जो पूल बांधला तो त्याच्या नावानेच ओळखला जातो.अशी ही आहे वैभवशाली कॅनडाची राजधानी! मी दोन वेळा पाहिली आहे.
डाॅ.भास्कर धाटावकर ,निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











