
प्रगती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आज खारघर येथील गिरिजा घर आश्रम येथे अनाथ मुलांसाठी व आश्रमातील ज्येष्ठ नकरिकांसाठी संपूर्ण आहार उपक्रम राबविला. संस्थेच्या सभासद आणि देणगीदार (नाव जाहीर न करण्याचे आवाहन) यांच्यासाठी सदर उपक्रम राबविला.

गिरिजा घर आश्रम येथे तीस मुले व सत्तर ज्येष्ठ नागरिक असून या सर्वांना संपुर्ण आहार व विविध प्रकारचे बिस्किट्स पूढे वाटप करण्यात आले. वाढदिवस अशा रीतीने साजरा करून आणि अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद देणारा हा उपक्रम स्तुत्य असून याचे गिरिजा घर आश्रमच्या व्यवस्थापकाने आभार मानले.












