राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार

मुंबई : राज्य मंत्री मंडळाचा विस्तार रविवारी 16 जून रोजी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पत्रकारांना सांगितले. मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला डच्चू मिळणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या मंत्रिमंडळात सात जागा रिक्त आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री पद मिळणार का? याबद्दल ही उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा चार , शिवसेना दोन आणि आरपीआय एक अशा प्रकारे मंत्री पद वाटप होणार असल्याचे समजते.