
नवी दिल्ली -कोणत्याही राज्यात राज्य सरकारच्या परवानगी शिवाय सीबीआय चौकशी करू शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब आणि मिजोरमने राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करू शकत नसल्याचे म्हटले आहे. या सर्व राज्यात भाजपचे सरकार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा आहे.
दिल्ली विशेष पोलिस स्थिरीकरण (डीएसपीई) कायद्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सीबीआयच्या अधिकारावर निर्णय दिला आहे.











