
बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये महिलांवरील अत्याचारावर चाप बसण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
आता आज (गुरूवार दि. 10 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जलविद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करतील.
याआधी कोरोना काळात मुख्यमंत्री घरीच बसून कारभार पाहत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. आता महामारीचे प्रमाण ओसरायला सुरुवात झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौऱ्यांचा धडाका सुरू केला आहे.
दरम्यान, याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी 5 डिसेंबर रोजी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला होता.











