माणुसकीचा वाढदिवस; मुलीचा वाढदिवस साजरा केला आगळ्या वेगळ्या पध्दतीने

नवी मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुख, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तसेच शिवसेना शिव वाहतूक सेना नवी मुंबई आणि नवी मुंबई रिक्षा टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था अध्यक्ष दिलीप किसनराव आमले यांनी त्यांच्या मुलीचा वाढदिवस आज माणुसकीचा वाढदिवस म्हणून साजरा केला.

मुलगी अंकिता हिचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने गर्दी आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला.

विभागातील रिक्षा टॕक्सी चालकांना मास्क , हात मोजे सेनिटायझर तसेच रिक्षा स्डॕन्टला मोफत सुचना फलक वाटप करुन गरजूंना कोरोना काळात महामारी विरुद्ध नेटाने लढण्याचा तसेच स्वतःची काळजी घेण्याची सूचना केली. या संकट काळात रिक्षा टॅक्सी चालकांना नक्कीच कोरोना पासून रक्षणासाठी उपयुक्त ठरू शकतात अशी भावना सर्व चालकांनी व्यक्त केली. मुलीचा वाढदिवस असा वेगळ्या पध्दतीने साजरा केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिलिप किसनराव आमले सोबत पदाधिकारी श्री सोपान जेजुरकर श्री जगनाथ कवडे श्री अकुश कदम श्री सजय पाटील श्री अमृत रावरे सौ सुनीता कापसे बाळासाहेब वाघमोडे तसेच नवी मुंबई शिव वाहतूकसेवा सर्व सदस्य स्टॕन्ड प्रतिनिधी सदस्य उपस्थित होते