
अग्गबई सासूबाई लोकप्रिय मालिकेतील दत्तात्रय बंडोपत कुलकर्णी यांची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (Ravi Patvardhan) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. आधी कोरोनाचे नियम, त्यानंतर रवी पटवर्धन यांचे खालावलेली प्रकृती आणि त्यानंतर त्यांचे अकाली निधन यामुळे गेले अनेक महिने ही दत्तात्रय बंडोपत हे पात्र प्रेक्षक खूप मिस करत होते. मात्र आता लवकरच हे पात्र पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. मात्र यात रवी पटवर्धन यांची जागा घेतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi)..
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे या मालिकेत आजोबांच्या भूमिकेत झळकणार आहेत. येत्या 4 जानेवारीला होणाऱ्या भागात मोहन जोशी आजोबांच्या भूमिकेतून या मालिकेत सहभागी होणार आहेत.











