
जो बिडेन (Joe Biden) यांनी आज एका भव्य समारंभात अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती (US President) म्हणून शपथ घेतली. त्याच वेळी कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी उपराष्ट्रपतीपदाची (Vice President) शपथ घेऊन इतिहास रचला. याच बरोबर आज अमेरिकेत बायडेन युग सुरू झाले.
शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये होत आहे. या शपथविधी सोहळ्यात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा उपस्थित आहेत. बिडेन यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि कॉंग्रेस नेते राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यात लेडी गागा आणि जेनिफर लोपेझ यांनीही सादरीकरण केले. लेडी गागाने अमेरिकेचे राष्ट्रगीत गायले, तर जेनिफर लोपेझ हिने This Land Is Your Land गायले. हे अमेरिकेचे सर्वात प्रसिद्ध लोकगीत आहे. लेडी गागा यावर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बिडेन यांच्या मोहिमेचा एक भाग होती.











