
सीरम इन्सिट्युटच्या मांजरी येथील प्लांट (SII’s Manjri plant) मध्ये आज आगीचा भडका उडाला आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीने बघता बघता 3 मजल्यांचे नुकसान केले आहे. या आगीत आतापर्यंत पाच जण मृत्युमुखी पडले आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, सीरमच्या मांजरी येथील प्लांट मध्ये बीसीजीचे उत्पादन होत होते. तर ही नवी इमारत असून येथे काही जण काम करत होते. त्या 3-4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान सध्या तेथे एक एनडीआरएफची तुकडी तैनात आहे.











