आवश्यक तिथं कंटेन्मेंट झोन तयार करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना आदेश

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी दिले आहे.

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी दिले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत.  (CM Uddhav Thackeray On Corona Patient Increase)

कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील, तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक आणि आवश्यक कारवाई केलीच पाहिजे. असे मुखयमंत्र्यांनी म्हटले आहे.

सर्व काही व्यवहार सुरु झाले आहेत. निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत. परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत.इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही. लोकांमध्ये बेफिकिरी आली असली, तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको.ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत. त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे.लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. असे मोठे वाक्य मुख्यमंत्र्यांनी केले आहे.