
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात तळकोकण ते विदर्भात भंडारा जिल्ह्यापर्यंत अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, रायगड, भंडारा, यवतमाळ, बीड, वाशिम, सोलापूर, औरंगाबाद, गोंदिया, परभणी, अमरावती, बुलडाणा, पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गुरुवार आणि शुक्रवारी मध्यम व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर गोंदिया बऱ्यापैकी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर, चंद्रपूर, नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम असल्यामुळे पुढे काही दिवस पाऊस होणार आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे.











