सावधान: मुंबईमध्ये आज तब्बल 1167 रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू रुग्ण संख्येमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबईमधील आजच्या कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा 1 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईमध्ये आज कोरोनाच्या 1167 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 32,1698 झाली आहे. 

सध्या शहरामध्ये जास्त लक्षणे व गंभीर रुग्ण तसेच मध्यम लक्षणे व दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी 13,119 बेड्स उपलब्ध आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 23 फेब्रुवारी 2021 नुसार शहरात सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या 51 आहे. सक्रिय सीलबंद इमारती या 815 आहेत.

राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.