Haffkine Institute मध्ये लस निर्मिती ते 45 वर्षांवरीलांना लसीची परवानगी मिळणार ?

नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसर राज्य सरकार कडून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबत बोलताना मुंबईच्या Haffkine Institute मध्ये लस निर्मितीला परवानगी मिळावी तसेच वयाचं, सहव्याधींचं बंधन झुगारून आता राज्यात 45 वर्षावरील सार्‍यांनाच कोरोनाची लस देण्यास मुभा मिळावी अशा दोन आग्रहाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळेस त्यांनी स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन लसीच्या आधारे मुंबई मध्येही Haffkine Institute ला लस निर्मिती करता यावी यासाठी 2 पर्याय सुचवले आहेत. या विचारामध्ये सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे.